म्हातारपण मजेत जाण्यासाठी

*पन्नाशी झाली साठी आली* 
*कशाला करतो चिंता  ?*
*प्रत्येक दिवस मजेत जगायचा* 
*वाढवायचा नाही गुंता* 

*वय झालं म्हातारपण आलं*
*उगीच बोंबलत बसू नको*
*विनाकारण बाम लावून*
*चादरीत तोंड खुपसू नको*

*रोजच यांना कशी काय होती*
*जळजळ  आणि  Acidity* 
*मलाच म्हणतेत या वयात*
*असते का कुठं सिमला , उटी ?*

*तुम्हीच सांगा फिरायला जायला*
*वयाचा संबध असतो का ?*
*नेहमी नेहमी घरात बसून* 
*माणूस आनंदी दिसतो का ?*

*पोटा पाण्यासाठी पोरं*
*घर सोडून जाणारच* 
*प्रत्येकाच्या आयुष्या मधे*
*असे रितेपण येणारच* 

*करमत नाही करमत नाही*
*सारखे सारखे म्हणू नका* 
*मित्रां सोबत दिवस घालवा*
*घरात कुढत बसू नका*

*आवडीच्या मित्र मैत्रिणींचा* 
*Group करायचा मस्त* 
*Sugar detect होई पर्यंत* 
*Ice Cream करायचे फस्त*

*देशातल्या देशात वा परदेशात*
*हिंडाय-फिरायला जायचं* 
*वय जरी वाढलं तरी* 
*रोमँटिक गाणं गायचं* 

*गुडघे गेले , कंबर गेली*
*नेहमी नेहमी कण्हु नका* 
*आता आपलं काय राहिलं* 
*हे बोगस वाक्य म्हणू नका*

*पिढी दर पिढी चाली रितीत*
*थोडे फार बदल होणारच* 
*पोरं पोरी त्यांच्या संसारात* 
*कळत नकळत गुंतणारच* 

*तू-तू , मैं-मैं  , जास्त अपेक्षा*
*कुणाकडूनही करू नका*
*मस्तपैकी जगायचं सोडून*
*रोज रोज थोडं मरू नका*

*एकमेकाला समजून घेऊन*
*पुढे पुढे चालावे*
*वास्तू तथास्तु म्हणत असते*
*नेहमी चांगले बोलावे*

Comments

Popular posts from this blog

फेसबुक व अन्य सोशल मीडियाचा पुरेपूर पण सुरक्षित वापर करा हे महत्वाचं. नाहीतर बसा malluapp वर शोधत

जहर है फ्रिज का पानी