फेसबुक व अन्य सोशल मीडियाचा पुरेपूर पण सुरक्षित वापर करा हे महत्वाचं. नाहीतर बसा malluapp वर शोधत

हल्ली रोज फेसबुकवर कोणाच्या ना कोणाच्या वॉल वर काही हास्यास्पद पोस्ट पाहायला मिळतायत. 'झुक्या भाऊ तुमच्याबद्दल काय म्हणतो' , 'मुली तुम्हाला बघून काय म्हणतात' , 'तुमचा मृत्यू कसा होईल' , 'किती मार खाल्ला आत्तापर्यंत तू भावड्या' , 'तुम्ही शिवाजी महाराजांच्या काळात असता तर' इथपर्यंतच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं फेसबुकवर शेअर केली जातायत. साला म्हटलं हे येत कुठून म्हणून थोडा शोध घ्यायच ठरवलं. त्या उत्तरावर क्लीक केलं तर त्या पेज वरून malluapps. net ला रीडायरेक्ट केलं गेलं. तिथे असलेच काहीसे प्रश्न आणि त्यांची उत्तर मिळवण्यासाठी तुम्हाला तुमच्या फेसबुक अकाउंटने लॉगिन करायचं होतं. आता मात्र डोक्यात किडा वळवळायला लागला आणि कुतूहलापायी malluapps. net ची कुंडली काढायची ठरवली. समोर आलेली माहिती खालीलप्रमाणे:
+ त्या पेजचे एकूण लाईक्स : ५,४७,०००
+ डोमेन एज : १ वर्ष ३९ दिवस
+ दररोज भेट देणारे(Daily Visitor) : १,७५,२९०
+ दररोज नवीन भेट देणारे(Daily Unique Visitor) : ३५०६
+ जाहिरातीतून मिळकत(Advertisement Income) : 
प्रतिदिवशी (Daily) $३३५ = रु. २२,४४५
प्रतिमाह (Monthly) $१०,०३६ = रु. ६,७२,४१२
प्रतिवर्षी (Yearly) $१,२०,४३२ = रु. ८०,६८,९४४
म्हणजे कोणी एक xxxx व्यक्ती भारतीयांच्या निव्वळ टाईमपासमधून वर्षाकाठी सरासरी ८० लाख रुपये कमवतेय. आणि हो भारतीयच यात अग्रेसर आहेत कारण countrywise statistics प्रमाणे हे malluapp वापरण्यात भारताचा पहिला नंबर लागतो. Malluapp च्या एकूण युसर्स पैकी ९०% युसर्स हे फक्त भारतात आहेत. जेमतेम एक वर्ष जुन्या या malluapp ने एवढ्या लाखाची कमाई काहीही न करता केली. गेल्या जुलै महिन्यापासून याचा वापर १०% वरून थेट ८०% च्या वर गेला आहे आणि सतत तो वाढतोच आहे. म्हणजे malluapp चा मालक लवकरच कोट्याधीश होईल आणि भारतीय बसतील शोधत की मुलगी तुमच्याकडे बघून काय बोलते. अशी अनेक अँप्स फेसबुक वर चालवली जातात त्यावर नुसतं क्लीक केल्यानेही त्या अँप मालकाला व फेसबुकला जाहिरातदारांकडून प्रचंड पैसा मिळतो. आपल्या बावळटपणाच्या जोरावर कोणीतरी पैसा मिळवतोय हा प्रश्न नाहीय पण आपले login credential त्या पेज वर हिट होतायत. फेसबुक सारख्या बड्या कंपनी वर डेटा लिकिंग चे आरोप परदेशात होतायत. तर या malluapp सारख्या third party अँपची काय गॅरंटी? याचाच वापर करून सायबर क्राईम वाढतायत. कारण आपल्या भारतीयांना एक घाणेरडी सवय की पासवर्ड लक्षात राहत नाही म्हणून सरसकट सगळीकडे म्हणजे फेसबुक, जीमेल, याहू, बँक अकाउंट, पेटीएम, फ्रीचार्ज यावर एकच पासवर्ड ठेवायची. मग या अँपमधून असा पासवर्ड जर लीक झाला तर त्याचे किती वाईट परिणाम भोगायला लागतील देव जाणे. आज ओटीपी, फिजिकल चेक, पासवर्ड पॉलिसी कडक करून सुद्धा फेसबुक व अन्य कितीतरी मेल व बँक अकाउंटस् हॅक केले जातायत आणि त्यातूनच सायबर क्राईम होतायत. मागे एक आर्टिकल वाचल होतं त्यात दिलेली माहिती किती खरी देव जाणे पण विचार करण्यासारखी नक्कीच होती. त्यात दिलेलं की पाश्चात देशाकडून मुद्दाम काही अँप्लिकेशन्स किंवा गेम्स यांचं क्रेझ निर्माण केलं जातं. जस की सबवे सरफर, कँडी क्रश, ल्युडो, कॅश ऑफ क्लँस यासारख्या गेम किंवा अँप यामध्ये पश्चिमात्यांच्या जीवनसारणीला अनुकरणीय असलेल्या आपल्या स्वभावानुसार अनेक भारतीय आपला वेळ, बुद्धी, श्रम व कर्तृत्व या क्रेझपायी खर्च करतात. ज्याचा परिणाम त्यांच्या कामावर व अनपेक्षितरीत्या भारत देशाच्या प्रगतीवर होतो. अस नाही की सोशल मीडिया वाईट आहे पण आपण तिचा वापर कुठच्या पद्धतीने करतो हे महत्त्वाचं. खरंतर फेसबुक सारखे माध्यम जागतिक घडामोडींना तुमच्यासमोर आयत मांडून ठेवत. थोडेफार पेज लाईक करून किंवा ग्रुप जोडून तुम्ही हवी ती माहिती मिळवू शकता. अगदी अत्याधुनिक तंत्रज्ञान, पाककला, राजकारण, समाजकारण, वैज्ञानिक, बँकिंग, कला, क्रीडा, पर्यटन, साहित्य, इतिहास आणि न जाणो कितीतरी क्षेत्राची माहिती आपल्याला फेसबुक मार्फत सहज मिळते. म्हणून म्हटलं विचार करा. फेसबुक व अन्य सोशल मीडियाचा पुरेपूर पण सुरक्षित वापर करा हे महत्वाचं. नाहीतर बसा malluapp वर शोधत की तुमच्या पक्षात तुम्ही आमदार होणार की खासदार.. शेवटी निर्णय तुमचा.

Comments

Popular posts from this blog

म्हातारपण मजेत जाण्यासाठी

जहर है फ्रिज का पानी