सिबिल रेटिंगबद्दल जाणून घेऊ थोडे
*सिबिल रेटिंगबद्दल जाणून घेऊ थोडे*
_सिबिल रेटिंगबद्दल आपल्यापैकी अनेकांनी ऐकलं असेलच. विशेषत:
कर्ज घेताना हे दोन शब्द नक्की ऐकायला मिळतात. आपलं आणि कर्ज या गोष्टीचं
नातं फार जवळचं आहे. सामान्यपणे गृहकर्ज, वाहन कर्ज किंवा वैयक्तिक कर्ज
घेण्यासाठी याची गरज असतेच. अशावेळी जर बॅंकेने आपले क्रेडिट स्कोअर खराब
असल्याच्या कारणामुळे कर्ज नाकारले गेले तर? अशी वेळ येऊ नये यासाठी सिबिल
रेटिंगबद्दल जाणून घेणे गरजेचे आहे._
*सिबिल स्कोर म्हणजे काय?*
क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो या कंपनीतर्फे देशभरातील सर्व कर्जदारांची माहिती गोळा केली जाते. देशभरातील सुमारे ९०० सरकारी, खासगी, सहकारी बॅंका तसेच नॉन बॅंकिंग फायनान्सिएल इन्स्टिट्यूट्स यामध्ये सहभागी आहेत. आपण घेतलेली कर्ज अथवा क्रेडिट कार्ड्स यांची आपण परतफेड कशी करतो आहोत, याची इत्यंभूत माहिती सिबिलकडे असते. आपण एखाद्या ठिकाणी कर्जासाठी अर्ज केला की ती संस्था आपला क्रेडिट स्कोअर सिबिलकडून मिळवते व त्यानुसार आपल्याला कर्ज द्यायचे की नाही, यावर निर्णय घेते. आपण आधीच्या कर्जांची अथवा क्रेडिट कार्डाची परतफेड केली नसेल अथवा योग्य पद्धतीत केली नसेल, तर तुमचे क्रेडिट रेटिंग हे नकारात्मक म्हणजेच कमी येते त्यामुळे तुमचा नव्या कर्जाचा अर्ज नाकारला जातो.

*कसा ठरवतात सिबिल स्कोर?*
आपले क्रेडिट रेटिंग सुधारण्यासाठी आपल्याला आपला ‘सिबिल स्कोअर’ जाणून घेणे गरजेचे आहे. ‘सिबिल स्कोअर‘ हा एक तीन आकडी नंबर असून, तो कर्जदाराने पूर्वी घेतलेल्या कर्जाच्या कामगिरीवर अवलंबून असतो. कर्जाची कामगिरी ही घेतलेल्या कर्जाची रक्कम, तारण, कर्जाचे कारण, घेतलेल्या कर्जाचा वापर, कर्जाचा कालावधी, परतफेड करतानाचा बॅंकेचा अनुभव, कर्ज घेण्याची वारंवारिता (फ्रिक्वेन्सी), कर्जातील अनियमितता या सर्व बाबींचा एकत्रित विचार करून ठरविला जातो. त्यानुसार कर्जदारास स्कोअर (गुण) दिला जातो. हा स्कोर ३०० ते ९०० च्या दरम्यान असतो. जितका स्कोअर जास्त तितका कर्जदाराचा ‘परफॉर्मन्स‘ चांगला समजला जातो.

*‘सिबिल स्कोअर‘ची वर्गवारी खालीलप्रमाणे केली जाते :*
Comments
Post a Comment