मत मांडणं ही फार मोठी गोष्ट नाही.मत न मांडणं ही पण फार मोठी गोष्ट नाही.तर संयमीपणाने ,पूर्वग्रहरहित, तिरस्कारशून्य आणि अभ्यासपूर्ण मतं

मत मांडणं ही फार मोठी गोष्ट नाही.मत न मांडणं ही
पण फार मोठी गोष्ट नाही.तर संयमीपणाने
,पूर्वग्रहरहित, तिरस्कारशून्य आणि अभ्यासपूर्ण मतं
मांडणं ही फार मोठी गोष्ट आहे.प्रत्येक निर्णयाचे
फायदे तोटे हे असतातच.प्रत्येक निर्णय हा दिशादर्शक
असतो.तो भविष्यकाळात माणसाने काय करावं
किंव्हा काय करू नये,याविषयीही मार्गदर्शक ठरू शकतो.पण मुळात चलबिचल आणि गोंधळलेल्या
मानसिकतेत राहून निर्णयच न घेणं हे त्याहून फार वाईट....
एकंदरीत,नोटबंदी वर मी काही बोललो नाही,बोलत
नाही आणि बोलनारही नाही.निर्णय बरोबर कि चूक हे  येणारा काळ ठरवेलच..पण यानिर्णयानंतर ज्या पद्धतीने
काही लोकांची मानसिक पातळी ढासळली ही मात्र
चिंतेची बाब आहे..
ज्या दिवशी निर्णय झाला त्यादिवशी शरद पवार
आणि तत्सम विरोधीपक्षनेते ययांच्यावर एकदम
खालच्या थरातले विनोद केले गेले.त्यांनतर भक्त
लोकांकडून देशभक्ती ही शिकवण्यात आली..पुढच्या
आठ दिवसात निर्णय बरोबर,पण अंमलबजावणी चुकली असं म्हणून अनेक लोकांनी मोदींवर खालच्या थरातल्या शब्दात टीका केली.उदा. ज्याला बायको सांभाळता नाही आली तो देश काय सांभाळणार??किंव्हा सतत रडणारी रडूबाई वगैरे वगैरे!!..त्यांनतर दोन दिवसांपूर्वी
मनमोहन सिंह बोलले,त्यावर काही लोकांनी ,"मोदीमुळे
का होईना मुका बोलायला लागला,आले की नाही
अच्छे दिन"असं म्हणून पातळी सोडली.
एकंदरीत ,ही माणसं कोण आहेत?? तर ज्यांनी आयुष्यात
करायला पाहिजेत अशा गोष्टी फार कमी
काळात पूर्ण केल्या असून स्वतःची ध्येय जवळपास
मिळवली आहेत..आणि त्यांच्यावर टीका कोण करतंय तर एकदम बिनकामे लोकं(मी सडकछाप म्हणणार होतो)👻
,ज्यांनी स्वतःच्या आयुष्यात अजून फार मोठं
गृहीत धारण्याजोग असं कोणतंही मोठं कर्तृत्व केलेलं
नाही.(माझ्यामते ४०,५० हजार रुपये महिना कमावणे म्हणजे फार
मोठं सक्सेस नसतं ,..)...उथळ प्रश्न विचारायला
,खाली बसून इतरांवर हसायला आणि घरात बसून इतरांना शिव्या द्यायला काहीही अक्कल लागत नाही,हो!
ज्या वयात आपल्याला साधं घर सांभाळता येत नाही
त्या वयात म्हणजे ३८ व्या वर्षी देशातलं सर्वात श्रीमंत
राज्य सांभाळालेले धुरंधर पवार असोत, घर दार सोडून
अगदी ६६ व्या वर्षीपण अगदी तरुण पोरासारखं दौरे करणारे आणि कामाचा मोठा आवाका असणारे मातब्बर मोदी असोत, कि दहा वर्षे पंतप्रधान,एक कुशल अर्थतज्ञ
असूनही वयाच्या ८४ व्या वर्षी मुलांना घडवण्यासाठी
प्राध्यापकाचं काम करणारे नम्र स्वभावाचे मनमोहन
सिंह असोत,हे सर्वच महारथी आहेत,ज्यांनी स्वतःचा
वेगळा इतिहास घडवलाय... ह्या सगळ्यांनाच कुणाच्याही कसल्याही बऱ्या वाईट प्रशस्तिपत्रकाची गरज नाहीये...
एकंदरीत ,प्रत्येक व्यक्तीला मत मांडण्याचा अधिकार
आहे.मतं मांडलीही पाहिजेत.प्रत्येक व्यक्तीला टीका
करण्याचाही अधिकार आहे आणि टीका केलीही
पाहिजे..फक्त तारतम्य बाळगून,सभ्यता राखून आणि
सर्वात महत्वाचं म्हणजे आपली आणि समोरच्याची योग्य ती लायकी ओळखून...
एकंदरीत कोणत्याही व्यक्तीची लायकी तो
कोणत्याही गोष्टी कशाप्रकारे हाताळतो यावरून
ठरते..मग ते मित्रत्व असो वा शत्रुत्व...प्रत्येक संघर्ष हा
कमरेखालचे वार केल्यानेच जिंकता येतो,हा समज
अर्धसत्य आहे असं मला वाटतं...
उलट अनावश्यक संघर्ष टाळता येणं यावरूनच व्यक्तीची दूरदृष्टी दिसून येते.जी सगळ्यांकडेच
असते असं नाही....

Comments

Popular posts from this blog

म्हातारपण मजेत जाण्यासाठी

फेसबुक व अन्य सोशल मीडियाचा पुरेपूर पण सुरक्षित वापर करा हे महत्वाचं. नाहीतर बसा malluapp वर शोधत

जहर है फ्रिज का पानी