समाजाने अाता बदललेच पाहिजे
*समाजाने अाता बदललेच पाहिजे*
====================
१. पैसा मुलांच्या शिक्षणावर, कुटुंबाच्या आरोग्यावर, गुंतवणूकीवर खर्च करा.*
२.
दिंड्या, वा-या, सप्ताह यात सहभागी होऊन पापमुक्ती व मोक्षप्राप्तीच्या
नादात व्यक्ती आपल्या प्रगतीचे (वेळ-पैसा-श्रम) चक्रच मारून टाकतो. पैसा व
बुध्दीचा अपव्यय होतो. *कर्मातच देव आहे यावर विश्वास ठेवा.*
३. *'माणूस सोबत काहीच घेऊन जात नाही', हे सांगण्यासाठी बुवा २५-५० हजार रुपये घेतो. अशा स्वामी, महाराज, बुवाबाबा यांचा नाद सोडा.*
शेती, व्यवसाय, विज्ञान, तंत्रज्ञान, आरोग्य, गुंतवणूक यांच्याशी निगडीत विचारवंतांच्या व्याख्यांनांचे आयोजन करा.
४. *शेतीतील, कुटुंबातील, गावकुसातील वाद समापोचाराने मिटवा. कोर्ट, कचे-यांचा मार्ग टाळा.*
५. कुटुंबातील सदस्यांवर, समविचारी मित्रांवर प्रेम करा. त्यांच्यासाठी वेळ द्या. सुख-दु:खात ते तुमची जास्त काळजी घेतील.
६. *शेतीवरच अवलंबून न राहता हळूहळू उद्योग-व्यवसायाकडे वळा* आणि एकमेकांना व्यवसायासाठी शक्य तेवढी मदत करा.
७.
*सर्व जाती-धर्मांचा आदर करा. मानव ही एकच जात व माणुसकी हा एकच धर्म*
त्यामुळे जातीवादाला आपली जगण्यात स्थान देऊ नका आणि धर्मांधांच्या नादीही
लागू नका.
८. मोडेल पण
वाकणार नाही, या स्वभावात आता बदल करा. काळ खूप बदलला आहे, याचे भान असू
द्या. (महापुरे झाडे जाती, तेथे लव्हाळे राहती - संत तुकाराम)
९.
*आपसी आणि स्वार्थी राजकारणामुळे समाजाचे खूप मोठे नुकसान झालेय.* आता ही
परिस्थिती बदला, *चांगले सुशिक्षित समाजसेवक लोकप्रतिनिधी निवडा* म्हणजे
पुढच्या अनेक पिढ्यांचे कल्याण होईल.
१०.
कमीत कमी गावात आणि जास्त वेळ शेतात/नोकरीत/व्यवसायात राहा. किमान ८ तास
काम करा... (कुठल्याही क्षेत्रात प्रगती होईलच). *स्वतःला कायम कामात आणि
चांगल्या विचारात गुंतवू ठेवा.*
११. पाय ओढण्याची खेकडा प्रवृत्ती सोडून समाजातील इतरांना मदत करा. (एकमेका साह्य करू).
१२. नियोजन व काटकसर करून आहे त्या उत्पन्नात आनंदाने जीवन जगता आले पाहिजे. *मोठेपणाच्या नादात कर्जबाजारी होऊ नका.*
१३.
*यात्रा, जत्रा, सत्यनारायण, वास्तुशांती, जागरण, गोंधळ, लग्न समारंभ,
डोहाळे (ओटीभरण), पाचवी, बारसे, तेरव्या, गोडजेवण आता बंद करा. वेळ आणि
पैशाचा अपव्यय टाळा*, एकमेकांच्या घरी गेल्यावर व लग्नात गेल्यावर अहेर
देणे बंद करा, यात फक्त व्यापारी वर्गाचा फायदा आहे. २००-३०० रुपयाची साडी
आजकाल कोणी घालत नाही, मग कशाला उगाच असा खर्च करायचा. पुजा-यांचे व्यवसाय
चालविणेही बंद करा.
१४. भांडकुदळ, लबाड, पैसे बुडवणाऱ्या लोकांपासून चार हात लांब रहा आणि मदत करणा-याचे कायमच ऋणी रहा.
१५. घरातील महिलांना सन्मानाची वागणूक द्या. *मुलींना उच्चशिक्षित करा.*
१६.
*महिलांना मंदिरं, उपासना, कर्मकांड यातून बाहेर काढा आणि प्रबोधन,
उद्बोधन करणा-या कार्यक्रमाला सोबत न्या*. त्यांच्या हातातील
पोथ्या-पुराणांची पुस्तके फेकून द्या आणि *मानवी इतिहासाची, विज्ञानाची,
विचारवंतांची पुस्तके द्या*.
१७.
*कर्मकांड करणे टाळा. त्यामुळे तुमचा खिसा रिकामा होतो. पुरोहितगिरीच्या
आहारी जाऊ नका*. तुमच्या ग्रह-नक्षत्रांची शांती ही केवळ एक फसवेगिरी आहे
आणि पुरोहितांसाठी ती 'रोजगार हमी योजना' आहे. त्यांच्या बिनामेहनत कमाईचे
ते साधन आहे. असल्या फसव्या षडयंत्रात अडकू नका. त्यांनी सांगितलेली
प्रत्येक गोष्ट आपण ऐकतो व त्याचाच ते फायदा घेतात. ही पूजा करा, तिकडे
नारायण नागबली करा, अमुक शांती करा... आणि त्यांचे ऐकण्याच्या नादात
अनेकांना स्वतःचे घर विकावे लागते.
१८.
घराघरात जो *मूर्ख TV चा बॉक्स आहे त्याच्यापासून होईल तेवढे लांब राहा,*
सतत वेगवेगळ्या गोष्टीत गुंतवून ठेवण्याचं काम TV करतोय, आपली सर्व वैचारिक
बुद्धीचा नायनाट केला आहे या TV ने.
१९.
आपलं आयुष्याचं आपण स्वतःच्या चांगल्या वाईट अनुभवाने *योग्य आर्थिक
नियोजन* करून सुरळीत ठेवा, व स्वतः कष्टाने कमावलेल्या पैशात आपल्या
कुटुंबाला खुश ठेवा.
२०. *चांगल्या गोष्टीना चांगले म्हणा, वाईट गोष्टींचा कडाडून विरोध करा, कायम सत्याच्या पाठीशी राहा, अन्यायाविरुद्ध उभे राहा,*
२१. आपल्या कौटुंबिक जबाबदारी बरोबर आपल्या समाजासाठी एक *सामाजिक बांधिलकी* म्हणून आपल्या आयुष्यात काहीतरी चांगले काम करून जा,
Comments
Post a Comment