छत्रपती शिवाजी राजेंच्या मृत्यू नंतर समर्थ हेलावून गेले
छत्रपती शिवाजी राजेंच्या मृत्यू नंतर समर्थ हेलावून गेले
सर्व धातू पात्रांचा वापर बंद केला मृत्तिका पात्र आणि फक्त दूध घेऊ लागले.
चाफळला होते.
गडावर जाण्याचा संकल्प केला कारण चाफळला काही झाले तर स्वामींच्या नादात भक्तगण रामाचे वैभव विसरतील.
रघुपतीपेक्षा लोक माझे महत्व वाढवतील म्हणून गडच ठीक.
रामाचा निरोप घेतला मागणे मागितले.
या देहाकडून सेवा घेतलीस. मीही ती केली. आता एक मागणे आहे.
आहे एकचि मागणे। कृपा करोनि देणे ।ज्यासी दर्शनाची इच्छा ।त्याची पुरवावी ।आस्था । बरोबर उद्धव स्वामी होते. स्वतःसाठी काही नाही.
राघवाने मागणे मान्य केले
पण अट घातली.
तेरा अक्षरी या मंत्राचा। जप करील जो साचा ।त्याची संख्या तेरा कोटी । होता भेटेन मी जगजेठी ।
समर्थ चफळकरांचा निरोप घेऊन गडावर आले.
कल्याण डोम गावाला परत गेले.
जवळची माणसे जवळ असली कि जाण्यात अडचण येते
चाफळ मठाची व्यवस्था लावून दिली. उद्भवला वाटले नंतर भांडणे नको पण ही निरवानिरव लक्षात आली नाही. अक्का अस्वस्थ होत्या.
काही विचारले तरी रघुरायाची इच्छा म्हणत.
माघ पौर्णिमा नवान्न पौर्णिमा
पण पुरण वरण गव्हाची खीर सुद्धा नाकारली.
मार्गशीर्षात कल्याणाची भेट झाली होती.
7 दशक 70 समास झाले होते.
जे जे लोकांना सांगावेसे वाटते ते लिहून काढले. पुन्हा वाचन झाले आणि ते मूळ ग्रंथाला जोडले.
अर्धवट कामे पूर्ण करण्याची गडबड केली. 20 वा दशक सुरु झाला.
भक्ताचेनी सभिमाने कृपा केली दाशरथीने। समर्थ कृपेची वचने तो हा दासबोध
जालें साधनाचे फळ।संसार झाला सफल। निर्गुण ब्रह्म ते निश्चळ । अंतरी बिंबले ।
माघ वद्य प्रतिपदेपासून दूध आणि पाणी सुद्धा बंद केले. गडावर गर्दी वाढू लागली.
समर्थ पलंगावर बसलेले असत. नामस्मरण चालू असे.
आक्कानी गलबलून विचारावे हे प्रायोपवेशन कशासाठी?
वद्य पंचमी। उजाडली. समर्थ विशेष प्रसन्न दिसले.
आक्काना म्हणाले आज रामराया आपल्या पायांनी गडावर येत आहे. त्याचे स्वागतात काही उणीव नको. सर्वांना वाटले स्वामींना भ्रम झाला.
पण तंजावरहून खरोखर व्यंकोजी राजांनी पाठवलेल्या मूर्ती गड चढून येत होत्या.
लगबगीने तयारी होऊन उत्तम स्वागत झाले. दूधपाणी, ढोल, ताशे, सनईचौघडा, पायघड्या झांज, चिपळ्या सर्व वाद्ये होती. आनंदी आनंद होता.
षष्टीचा दिवस गेला
मध्येच समर्थ म्हणत सिंहासनपर बैठे राम । कपी आये है तमाम । पिछे ठाडे है हनुमान। करे या नौकरी ।
दम लागायचा. आक्का, उद्धव पुढचे पूर्ण करायचे. पुन्हा समर्थ म्हणायचे रविकुल टिळका रे वेध सन्निध आला
त्यांची प्रसन्नता पाहून उद्धव म्हणतो
अनुदिनी नवमी हे मानसी आठवावी । बहुत लगबगीने कार्य सिद्धी करावी।। त्याच क्षणी आक्का चरकल्या. रामरायाने नावमीची सूचना दिली नसेल ?
एवढा सहवास होऊनही बोध झाला नाही का ?
हा देह सोडणे म्हणजे मृत्यू नव्हे ते देह परिवर्तन आहे.
उद्धव म्हणतात आम्ही सामान्य. आपलं सांगून रूप समोर असावे ही इच्छा वावगी आहे का ?
पूजा करावी वाटली, सल्ला विचारावा वाटला, दर्शन ह्यासाठी कुठे जाणार
समर्थ सांगतात माझी काया आणि वाणी । गेली म्हणाल अंतःकरणी। पण मी आहे जगज्जीवनी। निरंतर
माझ्याशी हितगुज करावे वाटले
आत्माराम दासबोध । माझे स्वरूप स्वतः सिद्ध। असता न धरावा खेद। भक्त जनीं.
शेल्याने झाकलेल्या मूर्ती. समर्थांनी शेला बाजूला केला.
उच्चासनावर मूर्ती ठेवल्या. त्यांच्या डोळ्यावरचे मेण समर्थांनी काढले.
जणू त्याच क्षणी प्राणप्रतिष्ठा झाली.
गुरुशिष्याची नजर भेट झाली. ये ह्रुदयीचे ते हृदयी विराजमान झाले.
दगदग होऊन समर्थ पलंगावर बसले.
रामराया एवढ्या लांबून येण्याचे श्रम केले. मला नेण्यासाठी स्वतः आलात.
माघ वद्य नवमी उजाडली
समर्थ उठले. राममूर्तींना नमस्कार केला.
स्नान केले.
लंगोटीवर खाली पद्मासनात बसले. ध्यान लावल.े आक्काना हुंदका आला.
त्यांनी डोळे उघडले.
भीमस्वामी त्यांना पलंगावर बसवू पहातात.
10 जणांना ते भारी ठरले.
महारुद्र हनुमान कि जय.
मनुका आणि पाणी घेतले.
बाहेर पटांगणात श्रीराम जयराम जयजयरामचा गजर अखंड चालू होता.
शनिवारचा दिवस होता. दुस-या प्रहराची वेळ होती.
माझी काया आणि वाणी
यांची आठवण करून दिली.
सर्वांना बाहेर बसायला सांगितले. फक्त आक्का आत होत्या.
कपाळाला गोपी चंदन लावले. गळ्यात तुळशीमाळ.
तेज:पूंज मूर्ती आक्का न्याहाळत होत्या. समर्थ उत्तराभिमुख बसले होते.
हर हर हर जप चालू होता. ही त्यांची समाधी अवस्था होती.
खणखाणीत आवाजात समर्थ ३ वेळा
श्रीराम
श्रीराम
श्रीराम
म्हणतात.
त्यांच्या त्या धीरगंभीर आवाजाने जणू आकाश हेलावले.
तो
कोदंडधारी सितापती लगबगीने तिथे आला. त्याने आपल्या परमप्रिय लाडक्या
भक्ताला आपल्या बाहूंत कवटाळले. त्याच्या मांडीवर त्याच्या मायेच्या पदराआड
हा लाडका बाळ जन्मभराचा शीण घालवू लागला.
जय जय रघुवीर समर्थ
आज
"दासनवमी". समर्थ रामदासस्वामींचा महानिर्वाण दिन. समाजाला आपल्या उत्कट व
अत्युच्च रामभक्तीसह दासबोधरूपाने जीवन जगण्याचे मर्म सांगून दिशा
दाखविणा-या या थोर संतविभूतीला शतशत नमन.
Comments
Post a Comment