कसलं भारी होतं जीवन, नव्हती कसली भ्रांत.. पैसे नसत बाबांकडे तरी ते दिसत शांत..
कसलं भारी होतं जीवन,
नव्हती कसली भ्रांत..
पैसे नसत बाबांकडे
तरी ते दिसत शांत..
रिकामे डबे आई कधी
आदळत ही नसे..
तेल नसे भाजीला तरी
चव अविट असे..
चपाती तर घरी
पाहूणे अल्यास कधीतरी व्हायची
ती खायला मिळणार
या आनंदातही तृप्ती असायची..
सगळ्या मोसमातील रानमेवा
कोणीतरी आणून द्यायचे..
आई बसायची वाटायला
तरी रूसण्याच कौतुक असायचे..
डोळे मिचकावत चिंचा खाताना
गप्पा किती रंगत..
चटणी भाकरीची मग
बसे अंगत पंगत
धो धो पाऊस कोसळताना मुद्दामच भिजायचं
आजीच्या सुती लुगड्यान मग ओल डोक पुसायच..
कुडकुडणार्या थंडीत
चुलीचीच शेकोटी असायची
विश्वाचं ज्ञान देत मग
आई भाकरी थापायची..
एकच स्वेटर दर वर्षी
जपून ठेवला जायचा..
खुपच लहान झाला तर
लहान भावाला द्यायचा..
उन्हाळ्याच्या सुट्टयात
सगळे आंबे खायला जमत..
खोल्या भरून आंबे असतानाही पाडाच्या अंब्यासाठी भांडणे जुंपत..
काहीच नव्हतं जवळ तरी
माणस खुप श्रीमंत होती..
गरीबीत जगतानाही
माणसात माणूसकी होती..
आता पैसा आहे बाबांकडे
डबेही भरलेले
पण तरीही असते आदळापट आणि
बाबा चिडलेले..
चपाती रोज गॅसवर बनवली जाते
रोज दोन तीन भाज्या..
ताट भरलेले तीनही वेळा
पण एकट्याला जेवणाची सजा..
सण येतात आणि जातात
सजले धजलेले फोटो अपलोड करण्यासाठी..
वेळ नसतो मुलाला आईस भेटण्यासाठी..
सगळी फळं मिळतात बाजारात
चव नसते कशाला..
अॅसीडच्या मारयाने संपवलेले असते जीवनसत्वाला..
सगळ मिळवलं माणसानं
पण समाधानच गमावलं..
खिसे भरले पैशांनी पण
मनच रिकामं झालं..
खुप श्रीमंत झाला माणूस पण
माणूसकी हरवून बसला..
भरल्या घरात राहूनही
आनंद बाहेर शोधू लागला..!
Comments
Post a Comment