मुतखडा म्हणजे काय? मुतखडा किती मोठा असतो, कसा दिसतो, तो मुत्रमार्गात कुठे दिसू शकतो?
मुतखडा म्हणजे काय?
मुतखडा किती मोठा असतो, कसा दिसतो, तो मुत्रमार्गात कुठे दिसू शकतो?
काही व्यक्तींत विशेष करून मुतखडा का दिसून येतो? मुतखडा होण्याची मुख्य कारणे कोणती?
मात्र अनेक जणांमध्ये पुढील कारणांमुळे मुतखडा तयार होण्याची शक्यता असते
मुतखड्याची लक्षणे
मुतखड्यांच्या वेदनांची विशिष्ट लक्षणे
मूतखड्यामुळे किडणी खराब होऊ शकते का?
मुत्रमार्गातील मुतखड्याचे निदान
मुत्रमार्गाच्या मुतखड्यावरील उपचार
मुतखडा एकदा नैसर्गिक रुपात किंवा उपचारांद्वारे निघून गेल्यानंतर या आजारापासून संपूर्णपणे मुक्ती मिळते का?
पुन्हा मुतखडा होऊ नये म्हणून रोग्याने कुठली काळजी घ्यावी आणि पथ्य पाळावे?
जास्त प्रमाणात पाणी पिणे
आहार नियंत्रण
औषधाने उपचार
मुतखड्याचा
आजार हा पुष्कळ रोग्यांमध्ये दिसून येणारा किडनीचा एक महत्वपूर्ण रोग आहे.
मुतखड्यामुळे असह्य वेदना , लघवीत संसर्ग आणि किडनीचे नुकसान होऊ
शकते.त्यामुळेच मूतखड्याबद्दल तसेच तो थांबवण्यात उपाय जाणून घेणे गरजेचे
आहे.
मुतखडा म्हणजे काय?
लघवीत
कँल्शीयम औक्झलेट किंवा इतर क्षारकण(Crystals) एकमेकांच्यात मिसळल्यानंतर
काही काळानंतर हळूहळू मुत्रमार्गात कठीण पदार्थ तयार व्हायला
लागतात,त्यालाच मुतखडा असे म्हणतात.
मुतखडा किती मोठा असतो, कसा दिसतो, तो मुत्रमार्गात कुठे दिसू शकतो?
मुत्रमार्गात
होणारा मुतखडा वेगवेगळ्या लांबीचा आणि वेगवेगळ्या आकाराचा असतो. हा
रेतीच्या कणाएवढा छोटा किंवा अंडाकार आणि बाहेरून नरम असतात अशा प्रकारच्या
खड्यांमुळे कमी वेदना होतात आणि ते सहजपणे नैसर्गिकरित्या लघवीबरोबर बाहेर
पडून जातात.
काही खडे ओबडधोबड असतात, ज्यामुळे खूप
वेदना होतात आणि ते सहजपणे लघवीबरोबर बाहेर पडत नाही .मुतखडा सामान्यतः
किडणी,मुत्रवाहिनी आणि मुत्राशायात दिसून येतो.
काही व्यक्तींत विशेष करून मुतखडा का दिसून येतो? मुतखडा होण्याची मुख्य कारणे कोणती?
साधारणतः आपल्या लघवीत असलेले काही खास रासायनिक पदार्थ, क्षारकण एकमेकांत मिसळण्यास रोखतात, त्यामुळे मुतखडा बनत नाही.
मात्र अनेक जणांमध्ये पुढील कारणांमुळे मुतखडा तयार होण्याची शक्यता असते
पाणी कमी पिण्याची सवय
अनुवंशिकतेमुळे मुतखडा होण्याची शक्यता .
मुत्रमार्गात वारंवार संसर्ग होणे
मूत्रमार्गात अडथळा असणे
व्हीटँमीन सी किंवा कँल्शीयम असलेल्या औषधांचे अधिक सेवन करणे.
दीर्घकाळ अंथरूणावर पडून राहाणे
हायपरपँराथायरॉईडीझमचा त्रास असणे.
मुतखड्याची लक्षणे
सर्वसामान्यपणे मुतखड्याचा आजार ३० ते ४० वर्ष वयोगटात आणि महिलांच्या तुलनेत पुरुषांच्यात ३ ते ४ टक्के अधिक दिसून येतो.
अनेक
वेळा मूतखड्याचे निदान अचानक होते. ज्या रोग्यांमध्ये मुतखड्याची कोणतीही
लक्षणे दिसत नाहीत. त्यांना ‘सायलेंट स्टोन ‘असे म्हणतात.
पाठ आणि पोटात सतत वेदना होतात.
उलटी येते,मळमळ होते.
लघवीच्या वेळी जळजळ होते.
लघवीतून रक्त जाते.
लघवीत वारंवार संसर्ग होतो.
लाघवी होणे अचानक बंद होते.
मुतखड्यांच्या वेदनांची विशिष्ट लक्षणे
ह्या वेदना खड्याचे स्थान , आकार,प्रकार आणि लांबी-रुंदीवर अवलंबून असतात.
मुतखड्याची वेदना अचानक सुरु होते. ह्या वेदनेमुळे डोळ्यासमोर तारे चमकू लागतात इतकी ती असह्य असते.
किड्नीतील मुतखड्याची वेदना कमरेपासून सुरु होऊन जांघेकडे जाते.
मुत्राशयातील खड्यामुळे जांघ आणि लघवीच्या ठिकाणी वेदना होतात
हि वेदना चालण्या-फिरण्याने किंवा खडबडीत रस्त्यावर वाहनातून प्रवास करताना लागणाऱ्या धक्क्यामुळे अधिक वाढते .
हि वेदना साधारणतः अनेक तास राहते,नंतर आपणहून कमी होते
बहुतेक वेळा हि वेदना अधिक झाल्यामुळे रोग्याला डॉक्टरकडे जावेच लागते आणि वेदना कमी करण्यासाठी औषध किंवा इंजेक्शनची गरज लागते.
मूतखड्यामुळे किडणी खराब होऊ शकते का?
होय.
अनेक रोग्यांमध्ये मुतखडा गोल,अंडाकर आणि चिकट असतो. बहुधा अशा खड्याची
कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत. असा खडा मुत्रमार्गात अडथळा निर्माण करू
शकतो. ज्यामुळे किडणीत तयार झालेली लघवी मुत्रमार्गातून सरळ जाऊ शकत नाही
आणि त्यामुळे किडणी फुगते.
जर या खड्यावर योग्यवेळी
योग्य उपचार झाले नाहीत, तर दीर्घकाळ फुगून राहिलेली किडणी हळूहळू कमजोर
होऊ लागते आणि नंतर काम करणे पूर्ण बंद करते.अशाप्रकारे किडणी खराब
झाल्यानंतर जरी मुतखडा बाहेर काढला तरी किडनी पुन्हा पूर्णपणे काम करेलच
याची शक्यता कमी असते.
मुत्रमार्गातील मुतखड्याचे निदान
मुत्रमार्गाची सोनोग्राफी आणि पोटाच्या एकसरेच्या मदतीने ह्या खड्याचे निदान केले जाते.
Comments
Post a Comment