पन्नाशीची कहाणी
पन्नाशीची कहाणी
काही म्हटले तरी हा महत्वाचा टप्पा….
स्थिर झालेला गृहस्थाश्रम …. पकडून ठेवलेली नोकरी…..
आपली मुले अशी का वागत आहेत त्याची चिंता……
शरीरातले सांधे हे दुखण्यासाठी असतात याची जाणीव…..
काही खाण्यापूर्वी ते खावे कि न खावे ….हा विचार …
रात्रीच्या झोपेत वाढलेल्या बाथरूम च्या वाऱ्या……
दिवसाच्या उत्तरार्धात येणारा थकवा….
अचानक जीवनात वाढलेली बुरोक्रसी…आणि फॉर्म भरण्याचा कंटाळा…..
हॉस्पिटल आणि स्मशानभूमी ह्यांना वाढलेल्या भेटी…..
सुखापेक्षा “वस्तू” जास्त असलेले सुखवस्तू जीवन….
कधीही नसलेला वेळ….
भरभर आणि वरवर केलेलं संवाद …..
घर सोडल्यावर दार नीट लावले का दिवे मालवले का….या शंका…..
कार्यक्रम रद्द झाले कि आनंद …. उत्तरोत्तर सहन न होणारे पाहुणे……
शक्यतो स्वता:च्या घरात स्वताच्या पलंगावर झोपण्याची इच्छा…..
बोथट होत चाललेल्या भावना ……
पुरुषांचे चष्मे,टकले आणि पोटे……
आणि बायकांना बायकांचे प्रश्न…..
आणि या सगळ्यातून निवृत्तीला किती वर्षे राहिली याचे वेध…..
नोकरी आणि इतर जबाबदाऱ्या संपल्या कि आपण कसे आनंदात जगू हि क्वचित स्वप्ने…..
Comments
Post a Comment