बॅकसीट... प्रत्येक गाडीला असतेच... त्यात काय विशेष ?तुम्हाला तुमच्या आयुष्याच्या गाडीला टर्न द्यायचा असेल

बॅकसीट                     
बॅकसीट... प्रत्येक गाडीला असतेच... त्यात काय विशेष ?
आता जरा लक्ष द्या... 
आपल्या गाडीची बॅकसीट नजरेसमोर आणा... 
आठवा बरं कोण-कोण बसतं तुमच्या बॅकसीटवर...
ताई, दादा, आई, बाबा, मित्र-मैत्रिणी, इ.
तुम्ही एक स्टेटस वाचलं असेल...
With Mom - 20 km/hr..😇
With Friends - 80 km/hr 😉 &
Alone 120+... झिंगाट😈
तुम्ही आईला बॅकसीटवर घेऊन कधीच कट मारत नाही जाणार.... 😇
तेच जर सोबत मित्र असतील तर फुल्ल मस्ती...🙃
तेच जर कोणी खास 😍 असेल तर साधा खडासुद्धा लागू देत नाहीत ☺...
अन् एकटे 😎 असल्यावर तर वार्यावर स्वार...🏍💨
बघा ड्राईव्हर तुम्हीच पण तुमची बॅकसीट ठरवते तुम्ही गाडी कशी चालवणार ते.... 😲 
आहे की नाही गंमत...!😃
आयुष्यपण असेच असते...😌
बघा हं...
तुमची गाडी म्हणजे तुमचं आयुष्य, तिचे ड्राईव्हर अर्थात तुम्ही स्वतः आणि तुमच्यावर जीव टाकणारी व तुमच्यावर अवलंबून असणारी माणसं हीच तुमची  बॅकसीट...यामध्ये तुमचे आई-बाबा, ताई-दादा, नवरा/बायको-मुलं असे सर्व...
तुम्ही एक जरी योग्य किंवा चूकीचा निर्णय घेतला तर त्याचा आनंद किंवा त्रास हा तुमच्या बॅकसीटला १००% होणार म्हणजे होणारच...
तुमची व्यसने, चुकीचे मित्र   तुमच्या  बॅकसीटला चार-चौघात मान खाली घालायला लावतात... 
तेच जर तुम्ही एखादं चांगलं काम केलंत तर तुमच्या _बॅकसीट_च्या आनंदाला पारावार उरत नाही...
अहो अपघाताला ड्राईव्हर_च जबाबदार असतो हो पण _बॅकसीट वरचे मात्र फुकटच जखमी होतात... लक्षात येतय ना...?
आता तुमच्या आयुष्याच्या गाडीचं बॅकसीट पहा व एक छानसं Destination ठरवा... चांगले मित्र-मैत्रीण निवडा... मग बघा कसे अगदी सुखरुप पोहोचाल...🏡
एकच विनंती - तुम्हाला तुमच्या आयुष्याच्या गाडीला टर्न द्यायचा असेल , यु-टर्न द्यायचा असेल किंवा अगदी स्टंटच करावा वाटत असेल तेव्हा किमान एकदा तरी आपल्या _*बॅकसीट*चा विचार करुन मगच काय करायचं ते ठरवा...🙏🏼
बघा पटतंय का !

Comments

Popular posts from this blog

म्हातारपण मजेत जाण्यासाठी

फेसबुक व अन्य सोशल मीडियाचा पुरेपूर पण सुरक्षित वापर करा हे महत्वाचं. नाहीतर बसा malluapp वर शोधत

जहर है फ्रिज का पानी