छत्रपती श्री. संभाजी महाराजांचा मृत्यू

छत्रपती श्री. संभाजी महाराजांचा मृत्यू :- 
वय किमान ७० च्या वर असा एक मुघल सम्राट औरंगजेब हा त्या वेळी दिल्लीच्या तख्तावर बसून संपूर्ण हिंदुस्थानावर आपली हुकुमत गाजवीत होता.
                   त्या वेळी मराठ्यांचे छत्रपती छत्रपती श्री. संभाजी राजे होते. त्यांचे वय किमान ३२ वर्षे त्या काळी छत्रपती श्री. संभाजी राज्यांनी १२० लढाया केल्या होत्या. त्या मधून ते एकही लढाई हरले नव्हते. अश्या वीर योद्ध्याला पकडणे औरंगजेबला शक्य नव्हते. म्हणूनच औरंगजेब शस्त्र होऊन सोबत किमान ४ लाख सैन्याला घेऊन तो दक्खन मध्ये उतरला. त्याचे एक स्वप्न होते की त्याला काबुल पासून ते दक्खन पर्यंतचे संपूर्ण क्षेत्र मुघलांच्या ताब्यात घ्यायचे होते. पण त्याचे हे स्वप्ने पूर्ण झालेच नाही . कारण छत्रपती श्री. शिवाजी महाराजांनी असे होऊच दिले नाही. आणि म्हणून तो निराश झाला होता. छत्रपती श्री. शिवाजी महाराजांचे निधन १६८० ला ५० व्या वर्षी झाल्या नंतर सन १६८१ ला छत्रपती श्री. संभाजी राजे मराठ्यांचे छत्रपती झाले. मग औरंगजेबाने निश्चय केला की काही झाला तरी मी मराठ्यांचे हे राज्य त्यांच्याकडून घेऊनच राहील. म्हणून मग त्याने कुटनीतीने मराठ्यांमध्ये फुट पडायला सुरुवात केली. आणि यात छत्रपती श्री. संभाजींची जवळची नातलग सामील झाले. छत्रपती श्री. संभाजी राजे जवळ ४५ हजारांचे सैन्य होते. आणि त्यांच्या प्रत्येक हालचालींवर त्यांचे नातेवाईक नजर ठेवत होते. आणि ती खबर औरंगजेबला सांगत असे. या मुळेच आता छत्रपती श्री. संभाजीला पकडायची तयारी करून औरंगजेब शस्त्र सोबत किमान ४ लाख सैन्य घेऊन तो दक्खन मध्ये उतरला.
                                    आपल्या राजांकडे कमी सैन्य असल्यामुळे छत्रपती श्री. संभाजी राजे हरले आणि औरंगजेबाच्या एका सरदाराने छत्रपतींना ताब्यात घेतले.  छत्रपती श्री. संभाजी महाराजांचे डोळे फार तेजस्वी होते. त्यांने एक नजरही फिरवली तरी समोरचा माणूस घाबरून दोन हाथ लांब सरकून जायचा असेच काही त्या सरदारा सोबत सुद्धा झाले. एका एकी ते राज्यांना ताब्यात घ्यायला भीत होते. पण तरी अवाढव्य सैन्य असल्यामुळे त्यांना पकडले गेले. आणि त्यांना मोठ्या बंदोबस्तात तुळजापूर मार्गे बहाद्दूर गड या स्थळी नेण्यात आले. त्यांना एका उंटाच्या पाठीवर उलटे बांधून नेण्यात आले होते. अशा उंटावर सुईचे बसायचे म्हटले तरी किती त्रास होतो. तिथे राजांना उलटे बांधून बहाद्दूर गडावर नेण्यात आले होते. तेथे आणि एका कोठडीत ठेवण्यात आले . औरंगजेबला हे कळल्यावर त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला.  छत्रपती श्री. संभाजीला पहाण्यासाठी खूप तो व्याकुळ झाला होता. कारण या आनंद साठी त्याने ९ वर्ष वाट पहिली होती. साखळ दंडाने आणि दोरांनी छत्रपती श्री. संभाजीला बांधण्यात आले होते. औरंगजेब आपल्या सरदारांच्या सोबत त्या कोठडीत भेटण्यास गेला. तेथे सुद्धा औरंगजेब १० फूट लांब उभा राहून छत्रपती श्री. संभाजीशी बोलत होता.    
                    तो म्हणाला....
 ” संभा हमे तुम्हारी मराठा सल्तनत चाहिये, 
कैसे राजा हो तुम संभा हम तुम्हारे सल्तनत का एक किल्ला जीत न सके “
एक सरदार ” हुजूर , इन्हे इस्लाम पढने कहो “

औरंगजेब ” हम संभा को जनते है वोह इस्लाम कभी नही पढेगा “

 छत्रपती श्री. संभाजी राजे म्हणाले 
” अरे औरंग्या , आमच्या आबा साहेबांनी हे राज्य उभे केले आहे. या राज्याची एक इंच जमीन सुद्धा मी तुला देणार नाही. तुला जे करायचे आहे ते तू करून घे”

औरंगजेब  “हम तुम्हे ऐसे मौत देंगे की तुम हमारे सामने दया की भिक मंगोगे “
 छत्रपती श्री. संभाजी  ” मरायला घाबरत नाही मी औरंग्या, तू तो सुअर की औलाद है. हम तो शेर है. शेर की तऱ्ह जीते है और शेर की तऱ्ह मरते है. ज्या जमिनीसाठी तू या वयात एवढ्या आपल्या जीवाचा आटापिटा करतोय न बघ तुला दिल्लीत तर काय दिल्लीच्या दूर दूर पर्यंत तुझी कबर खोदायला जागा मिळणार नाही. शेवटी येशील तर तू आमच्याच मातीत .”

दरम्यानच्या कालवधीत छत्रपती श्री. संभाजी राजेंना आणि कवी कुलेश यांना  पुणे नजीकच्या तुलापुरला संगमेश्वर येथील नदी किनारी आणले होते. तुळापूर पुणे जिल्ह्यातील एक गाव आहे. पूर्वीचे नाव 'नांगरवास'.
तुळापूर हे गाव भीमा, भामा आणि इंद्रायणी नद्यांच्या त्रिवेणी संगमावर वसले आहे. तुळापूर आळंदी पासून साधारण १४ किमी वर, तर पुण्यापासून अंदाजे ३० किमी वर आहे. येथे संगमेश्वराचे प्राचीन मंदिर आहे. याच संगमावर औरंगजेबाच्या छावणीचा तळ होता.

औरंगजेब  ” बहुत जुबान चलती है इसकी. इसकी जुबान काट दो . लेकीन पहेले इसके साठी कवी कुलेश की कटना”
औरंगजेब मनात “इसे देखकर संभा डरजाएगा और दया की भिक मांगेगा हमारे सामने “

(कवी कुलेश यांना संभाजी राजसोबतच अटक करण्यात येते आणि त्यांना ही  छत्रपती श्री. संभाजी राज्यान सोबतच कोठडीत बंद करण्यात येते )

आदेश दिल्यावर दोन जल्लाद थोड्या वेळाने कोठडीत येतात आणि पहिले कवी कुलेश ची जीभ संध्शी ने ओढण्यात येते .
औरंगजेबला कळाल्यावर तो विचारतो संभा बाबत पण संभा जसे तसेच असतात . 

संभा की जबान काट दो ...असा आदेश तो देतो. 
पुन्हा ते दोन जल्लादना आदेश देण्यात येते तो  छत्रपती श्री. संभाजी राज्यांची जुब्बन कापण्यासाठी पुढे सरसावतात. पण अशा शूरवीर योद्ध्याला पाहून जल्लादही दोन पावले मागे सरकतात. छत्रपती श्री. संभाजी राजे आपला जबडा उघडायला तयार नसतात. त्यांना ४, ५ जन पकडून त्यांचा जबडा उघडून त्यांची ही जाबन लढण्यात येते. असेच मग औरंगजेब त्यांचे डोळे काढण्याचा आदेश देतो . एक सरदार आणि दोन जल्लाद जातात ते गरम साळखी घेऊन कवी कुलशे चे डोळे काढतात. मग छत्रपती श्री. संभाजी राजेच्या जवळ येतात. अगदी गरम गरम लाल सलाखी घेतात.  आणि मग दोन पावलं माघे सरकततात .

ते म्हणतात - ” आजतक हमने कितने लोगोकी आंखे निकाली मगर इनके जैसी तेजस्वी आंखे हमने कभी नाही देखी “

छत्रपती श्री. संभाजी राजेचे डोळे काढण्यात येते. मग त्यानंतर त्यांचे वाघ नखाने संपूर्ण अंग सोलण्यात येते. त्यांचे खांद्यापासून दोन्ही हाथ कापण्यात येते. एक एक पाय कापण्यात येते. पण ते रेहेम ची भिक मागत नाही. नंतर एक सरदार येतो आणि छत्रपती श्री. संभाजी राजेची आठवण म्हणून त्यांच्या   गळ्यात असलेली भवानी माळ काढण्याचा प्रयत्न करतो पण छत्रपती श्री. संभाजी राजांचा इशारा पाहताच. ती तशीच त्यांचा गळ्यात राहू देतो. एवढे अत्याचार सहन करून ही संभाजी राजे रहेमं ची भिक मागत नाही. आणि ते आपला देह सोडतात. पुढे त्यांच्या शरीराचे तुकडे तुकडे करून तुलापुरच्या अगदी जवळच असलेल्या मौजे वढू बुद्रुक या गावात इतस्तत फेकून दिले होते. तेंव्हा औरंगजेबाच्या सरदारांनी छत्रपती श्री. संभाजी राजेच्या शरीराचे अंत्यविधी करील त्याची पण अशीच अवस्था होईल. त्यामुळे छत्रपती श्री. संभाजी राजेंच्या शरीराचे विखुरलेले तुकडे जमा करायला कोणी तयार नव्हता . पण वढू बुद्रुकच्या काही लोकांनी हिम्मत दाखवून वढूच्या वनात असलेल्या निवडुंगाच्या झाडीतच त्यांचा अंत्ययात्रा ना काढता आणि खांदा न देता त्यांच्या पार्थिवाला अग्नी दिला गेला. 
 ते बलिदान देऊन अमर होतात,  
आपल्या राष्ट्रसाठी,
आपल्या भूमीसाठी .
हे सगळा कळल्यावर औरंगजेब म्हणतो -  ” या अल्लाह, आपने हमारे जनाने मे संभा जैसा बेटा पैदा क्यू नही किया ?”
छत्रपती श्री. संभाजी राजे बलिदान दिल्यानंतर झाल्या नंतर मराठ्यांचा छत्रपती म्हणून श्री. राजाराम यांना छत्रपती बनवण्यात आले. ते छत्रपती श्री. संभाजी राजांचे सावत्र भाऊ होते. छत्रपती श्री. संभाजी राजे यांच्या बलिदानानंतर औरंगजेब १८ वर्ष जगला पण त्याला मराठा साम्राज्याचा एक इंच जमिनी चा तुकडाही जिंकता आला नाही .
त्याने आपल्या मृत्यू पत्रात हे लिहून ठेवले आहे. की ” संभा शेर का छावा था”
‎”हमने उसकी आंखे निकाल ली लेकीन उसने हमारे सामने आंखे नही झुकायी“
“हमने उसके हाथ काट दिये लेकीन उसने हमारे सामने हाथ नही फैलाये “
” हमने उसके पैर काट दिये लेकीन उसने हमारे सामने घुत्ने नही टेके . “
“हमने उसका सर काट दिया लेकीन उसने हमारे सामने सर नही झुकाया .”
——————————————-
 छत्रपती श्री. संभाजी राजांनी बलिदान कशासाठी ?????
आपल्यासाठी?
त्यांनी जे जे सोसले ते आपल्यासाठी…
आणि आपण ???
 त्यांना काय दिल ??? 
एक मनाचा मुजरा ????
नाही….ना 
आपण त्यांना काय दिले फक्त बदनामी आणि बदनामी …..
तेंव्हा सर्व मराठी आणि हिंदुंनो 
निर्माण करा ते स्वराज्य पुन्हा आणि द्या त्या
“वाघिणी” ला मनाचा मुजरा जिने “वाघ”
पैदा केला....
द्या मानाचा मुजरा त्या “वाघा” ला ज्या ने असा छावा पैदा केला
आणि द्या मना चा मुजरा त्या “छाव्या” ला ज्याने
ते स्वराज्य टिकवून ठेवले....
आणी हसत हसत ज्याने स्वत : चे बलिदान दिले.  ते या स्वराज्यसाठी तो कामी आला….

Comments

Popular posts from this blog

म्हातारपण मजेत जाण्यासाठी

फेसबुक व अन्य सोशल मीडियाचा पुरेपूर पण सुरक्षित वापर करा हे महत्वाचं. नाहीतर बसा malluapp वर शोधत

जहर है फ्रिज का पानी