असा असावा थंडीतला आहार

👉 _*असा असावा थंडीतला आहार*_

_*LetsUp I Health Tips*_

आरोग्याच्या दृष्टीने हिवाळ्याचा मोसम म्हणजे आल्हादायक काळ असतो. यामुळेच हा काळ आरोग्य कमावण्यासाठी योग्य मानला जातो. कारण या दिवसात भाज्या, फळेही भरपूर आलेली असतात. म्हनुनच हिवाळ्यात आरोग्यदायी आहार नेमका कसा घ्यावा त्यावर एक नजर...

👉 हिवाळ्यात दुध, तुप, लोणी यांचा आहारात समावेश करावा. यामध्ये भरपूर प्रमाणात स्निग्धता, कॅलरीज असतात. त्यामुळे हिवाळ्यातील उष्णतेचे संतुलन राखण्यास मदत होते.

👉 मांसाहारी व्यक्तींनी हिवाळ्यामध्ये आहारात मटण, मांस, मासे, अंडी यासारख्या मांसाहाराचा समावेश करावा.

👉 आहारामध्ये तीळ, लसून, मिरी, मोहरी, लवंग, जीरे, आले, हिंग, तमालपत्र इ. मसाला वापरावा. त्यासाठीचा उत्तम उपाय म्हणजे लसणाची, तिळाची चटणी करावी.

👉 बदाम, काजू, मणूका, अक्रोड इ. सुका मेव्यामध्ये स्निग्ध उष्ण गुणधर्म असल्याने त्याचा आहारात समावेश करावा.

👉 गहू, ज्वारी, बाजरी ह्या धान्यांपासून बनवलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करावा. भाकरी बरोबर लोणी किंवा तुप खावे.

👉 हंगामी फळे, हिरव्या पालेभाज्या, फळभाज्यांचाही हिवाळ्यामध्ये आहारात भरपूर समावेश करावा. 

👉 या दिवसांत कोमट पाणी प्यावे. त्यामुळे आहाराचे पचन योग्य प्रकारे होण्यास मदत होते.

👉 थंडीत मिळणारे लाल गाजर, नवलकोल अशा भाज्या पौष्टिक तर असतातच पण त्यामुळे थंडीपासून रक्षणही होते. थंडीतल्या सर्दी, खोकला, फ्लू अशा आजारांना या भाज्यांच्या सेवनाने दूर ठेवता येते.

👉 थंडीच्या दिवसात ग्रीन टीचे सेवन उपयुक्त ठरते. कारण ग्रीन टीमध्ये भरपूर अँटी अॅक्सिडंट्स असतात. यामुळे अनेक बॅक्टेरियांचा प्रभाव कमी होतो.

👉 संत्री, द्राक्ष अशा फळांमध्ये क जीवनसत्त्व असतात. यामुळे त्वचेचे पोषण होते. कोलेस्टरॉल कमी करण्यासोबतच ही फळं चयापचय क्रिया ही वाढवतात.

👉 हिवाळ्यात मधाचा वापर आरोग्याला विशेष लाभदायक ठरतो. तसेच मोड आलेल्या कडधान्यांचाही आहारात समावेश करा.

Comments

Popular posts from this blog

म्हातारपण मजेत जाण्यासाठी

फेसबुक व अन्य सोशल मीडियाचा पुरेपूर पण सुरक्षित वापर करा हे महत्वाचं. नाहीतर बसा malluapp वर शोधत

जहर है फ्रिज का पानी