अक्कल बडी या भैंस (चर्चा) बडी ...

✍ अक्कल बडी या 
भैंस (चर्चा) बडी ...

        आजकाल डिग्री घेतलेली व्यक्ती हुशारच असते असा समज आहे. पण असे काही नाही.

 कधी कधी कोणतेही शिक्षण न घेतलेले लोक सुद्धा आपल्या अनुभवाने व व्यवहारी दृष्टिकोनाने असा काही चमत्कार घडवू शकतात, की ज्याने अनेक न सुटणाऱ्या समस्या  सोडवु शकतात,

     मुंबईतील एका कंपनीने अवाढव्य यंत्र जर्मनी मधुन मागवले होते.

ते यंत्र कंपनीच्या तळघरात  उतरवायचे होते. त्या काळात ते यंत्र पेलणारी मोबाईल क्रेन नव्हती.

 मुंबई पोर्ट कडे तशा क्रेन होत्या पण फिक्स्ड होत्या.

 माथाडी कामगारांनी ओंडक्यांच्या मदतीने ते ट्रेलर वरुन उतरवल.....

... पण ते तळघरात ३६ फुट खोल ठेवायचे कसे यावर जर्मन आणि भारतिय तंत्रज्ञ विचार करीत बसले होते.

 अखेरीस जम्शेदपुर वरुन क्रेम मागवायचे असे ठरले.पण त्यासाठी किमान २ आठवडे इतका तरी वेळ लागणार होता.......

माथाडी कामगार ही मजा पाहत होता. तो म्हणाला, ''साहेब मला आणी माझ्या माणसांना कशापायी इथे थांबवुन ठेवलय.....?''

त्याला सगळी परिस्थीती समजावून सांगितल्यावर तो चटदीशी म्हणाला, ''हत्तीच्या....!!! एवढंच  ना ....? मी सोडुन दाखवतो यंत्र खाली....''

इंजिनियर म्हणाले, "एवढे सोपे नाही राव ते" ....

जर्मन प्रमुखांनीही सुरुवातीला त्याचे बोलणे हसण्यावारीच नेल. एवढे भले भले  इंजिनियर डोक खाजवतायत तिथे हा अडाणी माथाडी कामगार काय करणार असे त्यांना वाटत होते ....???

निदान त्याच्या डोक्यात काय आहे हे तरी जाणुन घेवु या उद्देशाने व  कॉन्ट्राक्टरचा कॉन्फीडन्स पाहुन गमतीनेच त्याला यंत्र 36 फुट खोल तळघरात ढकलण्याची ऑफर देण्यात आली....

कंत्राटदाराने एकाच वेळी आईस फॅक्टरीमधुन ५-६ ट्रक बर्फ मागवाला, आणि तो तळ्घरात ढकलून दिला....

आणि खड्डा बर्फाने भरुन घेतला.....

मग ओंडक्यावरुन ते यंत्र ढकलत त्या बर्फावर आणले   ....

आणि एका बाजुने पाणी बाहेर काढण्यसाठी पंप सुरु ठेवला ....

जस जसा बर्फ वितळत राहीला तसं तसे खड्ड्यातील पंपाने पाणी तो बाहेर काढता राहिला ...

आणि हळु हळु यंत्र खाली जातं राहिले. अशा प्रकारे एक अवाढव्य यंत्र 36 फुट खोल तळघरात ठेवण्यात आले. 

हे पाहुन एक अशिक्षित माथाडी माणुस काय करणार म्हणून कुत्सितपणे बघणारे सर्व इंजिनियर चाट पडले...

 एका अशिक्षित अडाणी माणसाला जे जमले ते आपल्याला  सुचले सुद्धा नाही म्हणुन तो जर्मन तंत्रज्ञ डोक्याला हात लावुन बसला......

आयुष्यात फक्त पुस्तकी ज्ञान उपयोगी पडत नसते.

तर त्या जोडीला व्यवहारीक दृष्टिकोन व अनुभव फार मोलाचा असतो. *तसेच आयुष्यात कोणाला कमी लेखू नये*.

Comments

Popular posts from this blog

म्हातारपण मजेत जाण्यासाठी

फेसबुक व अन्य सोशल मीडियाचा पुरेपूर पण सुरक्षित वापर करा हे महत्वाचं. नाहीतर बसा malluapp वर शोधत

जहर है फ्रिज का पानी