LIFE MANAGEMENT साठी नियमावली
*यशस्वी जीवन जगण्यासाठी कोणती जीवनपद्धती अवलंबावी? यशस्वी व आनंदी जीवन जगण्यासाठी काय करावे याविषयी थोडक्यात माहिती किंवा नियमावली मी आपणास देत आहे ज्याचा अवलंब केल्यास आपणास नक्कीच फायदा होईल.*
*खालिल नियमांचा अवलंब करुन आपण आपल्या जीवनाला नवी दिशा देऊ शकता.*
LIFE MANAGEMENT साठी नियमावली*
*०१) सकारात्मक दृष्टिकोन* आपल्या डोक्यात सतत र्नेसर्गिक विचार पध्दती चालत असते.कोणताही विचार करताना तो सकारात्मक करा. मीच का असा विचार न करता मला संधी मिळाली मी ते करेल असा विचार करा.
*०२) ध्येय ठरवा* मला काय करायाचे आहे त्यासाठी मी काय करु शकतो यावर विचार करा.आपले ध्येय निश्चित करा.
*०३)आपल्या टार्गेट वर फोकस करा.* आपण आपल ध्येय ठरवल आहे त्यावर अधिक फोकस करा.इतर गोष्टीवर वेळ वाया घालवू नका.अधिक चिकाटीने काम करा यश नक्की मिळेल.
*०४) आव्हाने स्वीकारा* एखादे काम आपल्याला सोपवले तर ते challenge स्वीकारा.त्यातून तुम्हाला नवीन काही शिकायला मिळेल.मलाच का दिले असा विचार करु नका.धैर्याने त्याला सामोरे जा व जीवनात पुढे जा.
*०५) वेळेचा योग्य वापर करा.* कोणत्याही कामाला लगेल सुरवात करा कारण एकदा गेलेली वेळ परत येत नाही.आजचे काम उद्यावर ढकलू नका.एकदा वेळ निघून गेली कि त्या कामाची किंमत राहत नसते.
*०६) उत्तम सहकारी जोडा* आपण कोणत्याही क्षेञात असला आपल्या सोबत बरेच इतर सहकारी असतात.त्याच्यातील जे उत्तम आहेत अशा सोबत मिञीपुर्ण संबंध ठेवा त्याचा आपल्या नक्कीच फायदा होत असतो.
*०७) सोशल कम्युनिकेशन वाढवा* आपण अठवड्यातून एकदा किंवा आपणास जेव्हा शक्य असेल अशा वेळेस सामाजिक कार्यात सहभागी व्हा.याचा फायदा नक्की होतो.
*०८) संघ भावना* आपण शाळेत, office मध्ये किंवा इतर ठिकाणी काम करताना संघ भावना ठेवून काम करा जे काम आपण एकट्याने करु तेच काम सर्वांनी मिळून केल्यास अधिक फायदा होतो.
*०९) आरोग्याची काळजी घ्यया* आपण आपल्या आरोग्याची काळजी घ्या.मन व शरीर चांगले असेल तरच आपण कोणत्याही कार्यात यशस्वी होऊ शकाल त्यामुळे आपले आरोग्य संभाळा.रोज नियमित व्यायाम करा.
*१०) अपडेट राहा* काळ हा अतिशय गतीमान असतो.काळाप्रमाणे आपण बदलणे आवश्यक असते.जे नवीन आहे ते शिकत राहा.अपडेट राहा.
*११) नवीन शिकण्याची तयारी ठेवा.* जे नवीन येत आहे ते मला शिकायला हवं याची तयारी ठेवा. हे माझ्यासाठी नाही मला जमणार नाही अशी मानसिकता बनवू नका.जे नवीन येईल ते मी शिकेलच अशी मानसिकता ठेवा.
*१२) बिनधास्त Life enjoy करा* कोणत्याही गोष्टीचा जास्त विचार करत बसू नका. माझे कसे होईल? मला जमेल का? मी करु शकेल का? अशा प्रश्नावर जास्त विचार करत बसू नका? *काही प्रश्न सोडून दिले की आपोआप सुटतात* तेव्हा आनंदी राहा. *जीवन खूप सुंदर आहे त्याला आणखी सुंदर बनवा
Comments
Post a Comment