Posts

फेसबुक व अन्य सोशल मीडियाचा पुरेपूर पण सुरक्षित वापर करा हे महत्वाचं. नाहीतर बसा malluapp वर शोधत

हल्ली रोज फेसबुकवर कोणाच्या ना कोणाच्या वॉल वर काही हास्यास्पद पोस्ट पाहायला मिळतायत. 'झुक्या भाऊ तुमच्याबद्दल काय म्हणतो' , 'मुली तुम्हाला बघून काय म्हणतात' , 'तुमचा मृत्यू कसा होईल' , 'किती मार खाल्ला आत्तापर्यंत तू भावड्या' , 'तुम्ही शिवाजी महाराजांच्या काळात असता तर' इथपर्यंतच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं फेसबुकवर शेअर केली जातायत. साला म्हटलं हे येत कुठून म्हणून थोडा शोध घ्यायच ठरवलं. त्या उत्तरावर क्लीक केलं तर त्या पेज वरून malluapps. net ला रीडायरेक्ट केलं गेलं. तिथे असलेच काहीसे प्रश्न आणि त्यांची उत्तर मिळवण्यासाठी तुम्हाला तुमच्या फेसबुक अकाउंटने लॉगिन करायचं होतं. आता मात्र डोक्यात किडा वळवळायला लागला आणि कुतूहलापायी malluapps. net ची कुंडली काढायची ठरवली. समोर आलेली माहिती खालीलप्रमाणे: + त्या पेजचे एकूण लाईक्स : ५,४७,००० + डोमेन एज : १ वर्ष ३९ दिवस + दररोज भेट देणारे(Daily Visitor) : १,७५,२९० + दररोज नवीन भेट देणारे(Daily Unique Visitor) : ३५०६ + जाहिरातीतून मिळकत(Advertisement Income) :  प्रतिदिवशी (Daily...

असा असावा थंडीतला आहार

Image
_*असा असावा थंडीतला आहार*_ _*LetsUp I Health Tips*_ आरोग्याच्या दृष्टीने हिवाळ्याचा मोसम म्हणजे आल्हादायक काळ असतो. यामुळेच हा काळ आरोग्य कमावण्यासाठी योग्य मानला जातो. कारण या दिवसात भाज्या, फळेही भरपूर आलेली असतात. म्हनुनच हिवाळ्यात आरोग्यदायी आहार नेमका कसा घ्यावा त्यावर एक नजर... हिवाळ्यात दुध, तुप, लोणी यांचा आहारात समावेश करावा. यामध्ये भरपूर प्रमाणात स्निग्धता, कॅलरीज असतात. त्यामुळे हिवाळ्यातील उष्णतेचे संतुलन राखण्यास मदत होते. मांसाहारी व्यक्तींनी हिवाळ्यामध्ये आहारात मटण, मांस, मासे, अंडी यासारख्या मांसाहाराचा समावेश करावा. आहारामध्ये तीळ, लसून, मिरी, मोहरी, लवंग, जीरे, आले, हिंग, तमालपत्र इ. मसाला वापरावा. त्यासाठीचा उत्तम उपाय म्हणजे लसणाची, तिळाची चटणी करावी. बदाम, काजू, मणूका, अक्रोड इ. सुका मेव्यामध्ये स्निग्ध उष्ण गुणधर्म असल्याने त्याचा आहारात समावेश करावा. गहू, ज्वारी, बाजरी ह्या धान्यांपासून बनवलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करावा. भाकरी बरोबर लोणी किंवा तुप खावे. हंगामी फळे, हिरव्या पालेभाज्या, फळभाज्यांचाही हिवाळ्...

खरंच आपण राग, लोभ, मद, मत्सर सर्व विसरुन वाकडे झालेले नातेसंबंध टिकवण्यावर भर दिला पाहीजे.

घरात डबा भरुन खिळे असतात. त्यापैकी एक खिळा 'कालनिर्णय' भिंतीवर लावण्यासाठी आपण उचलतो. तो ठोकता ठोकता वाकडा होतो.  तर आपण तो वाकडा झालेला खिळा फेकुन देत नाही. बोटांवर हातोडीचे एक-दोन फटके बसले तरी चालतील, पण तोच वाकडा खिळा सरळ करुन आपल्याला परत वापरायचा असतो.  हाच प्रयत्न आपण ज्या नातेवाईकांशी, मित्रांशी, सहकाऱ्यांशी सकारण-अकारण वाकडं झालंय, ते संबंध सरळ करण्यासाठी केला तर? खरंच आपण राग, लोभ, मद, मत्सर सर्व विसरुन वाकडे झालेले नातेसंबंध टिकवण्यावर भर दिला पाहीजे. *जीवन खुप सुंदर आहे ते आनंदाने जगा*

छत्रपती श्री. संभाजी महाराजांचा मृत्यू

छत्रपती श्री. संभाजी महाराजांचा मृत्यू :-  वय किमान ७० च्या वर असा एक मुघल सम्राट औरंगजेब हा त्या वेळी दिल्लीच्या तख्तावर बसून संपूर्ण हिंदुस्थानावर आपली हुकुमत गाजवीत होता.                    त्या वेळी मराठ्यांचे छत्रपती छत्रपती श्री. संभाजी राजे होते. त्यांचे वय किमान ३२ वर्षे त्या काळी छत्रपती श्री. संभाजी राज्यांनी १२० लढाया केल्या होत्या. त्या मधून ते एकही लढाई हरले नव्हते. अश्या वीर योद्ध्याला पकडणे औरंगजेबला शक्य नव्हते. म्हणूनच औरंगजेब शस्त्र होऊन सोबत किमान ४ लाख सैन्याला घेऊन तो दक्खन मध्ये उतरला. त्याचे एक स्वप्न होते की त्याला काबुल पासून ते दक्खन पर्यंतचे संपूर्ण क्षेत्र मुघलांच्या ताब्यात घ्यायचे होते. पण त्याचे हे स्वप्ने पूर्ण झालेच नाही . कारण छत्रपती श्री. शिवाजी महाराजांनी असे होऊच दिले नाही. आणि म्हणून तो निराश झाला होता. छत्रपती श्री. शिवाजी महाराजांचे निधन १६८० ला ५० व्या वर्षी झाल्या नंतर सन १६८१ ला छत्रपती श्री. संभाजी राजे मराठ्यांचे छत्रपती झाले. मग औरंगजेबाने निश्चय केला की काही झाला तर...

कसलं भारी होतं जीवन, नव्हती कसली भ्रांत.. पैसे नसत बाबांकडे तरी ते दिसत शांत..

कसलं भारी होतं जीवन, नव्हती कसली भ्रांत..  पैसे नसत बाबांकडे तरी ते दिसत शांत.. रिकामे डबे आई कधी  आदळत  ही नसे.. तेल नसे भाजीला तरी चव अविट असे.. चपाती तर घरी  पाहूणे अल्यास कधीतरी व्हायची ती खायला मिळणार  या आनंदातही तृप्ती असायची.. सगळ्या मोसमातील रानमेवा कोणीतरी आणून द्यायचे.. आई बसायची वाटायला तरी रूसण्याच कौतुक असायचे.. डोळे मिचकावत चिंचा खाताना गप्पा किती रंगत.. चटणी भाकरीची मग  बसे अंगत पंगत धो धो पाऊस कोसळताना मुद्दामच भिजायचं आजीच्या सुती लुगड्यान मग ओल डोक  पुसायच.. कुडकुडणार्या थंडीत चुलीचीच  शेकोटी असायची  विश्वाचं ज्ञान देत मग आई भाकरी थापायची.. एकच स्वेटर दर वर्षी  जपून ठेवला जायचा.. खुपच लहान झाला तर  लहान भावाला द्यायचा.. उन्हाळ्याच्या सुट्टयात  सगळे आंबे खायला जमत.. खोल्या भरून आंबे असतानाही पाडाच्या अंब्यासाठी भांडणे जुंपत.. काहीच नव्हतं जवळ तरी  माणस खुप श्रीमंत होती.. गरीबीत जगतानाही   माणसात माणूसकी ह...

स्पर्धा परीक्षेच्या नावाखाली विद्यार्थ्यांचा टाईमपास

'स्पर्धा परीक्षेच्या नावाखाली विद्यार्थ्यांचा टाईमपास ' हा आपला लेख वाचला. लेखाच्या शीर्षकावरुन एका चांगल्या विषयाला आपण हात घातला असे वाटले. पण, नंतर माझी निराशाच झाली. अख्ख्या महाराष्ट्रात गावोगावी, सर्व महाविद्यालयांमध्ये, जिकडेतिकडे स्पर्धा परीक्षांचे गुणगान केले जात आहे. माफ करा साहेब, पण त्याचीच री तुम्ही ओढली. या परीक्षांमध्ये मोठ्या संख्येने उत्तीर्ण न होण्याचं खापर तुम्ही पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्याच डोक्यावर फोडलं. विद्यार्थी सोळा तास अभ्यास करत नसल्यामुळे ते या परीक्षांमध्ये उत्तीर्ण होत नाहीत असे आपले म्हणणे आहे.  प्रकाश भोसले साहेब, तुम्ही अतिशय तर्कशुद्ध लिहिता म्हणून तुम्ही माझा मुद्दा समजून घ्याल अशी मला आशा आहे. माझ्या माहितीप्रमाणे युपीएससीच्या दरवर्षी ११०० च्या जवळपास जागा असतात. गेल्या सात-आठ वर्षांपासून महाराष्ट्राचे १०० ते १२५ मुलं या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होत आहेत. महाराष्ट्राची लोकसंख्या देशाच्या १० टक्के आहे व हे उत्तीर्ण होणाऱ्यांचं प्रमाणही १० टक्के आहे. याचा अर्थ मराठी मुले यात मागे नाहीत.  यापेक्षाही जास्त प्रमाण वाढलं तर  ...

छत्रपती राजाराम महाराजांचा इतिहास प्रसिद्ध जिंजीचा प्रवास ! रायगड ते जिंजी एक खडतर प्रवास...!

छत्रपती राजाराम महाराजांचा इतिहास प्रसिद्ध जिंजीचा प्रवास !  रायगड ते जिंजी एक खडतर प्रवास...! आदिलशाही व कुतुबशाही एकेका वर्षाच्या अंतराने गिळंकृत केल्यावर आलमगीर बादशाह औरंगजेबाची भूक प्रचंड वाढली होती आता त्याच्यासमोर मराठ्यांशिवाय एकही शत्रू दख्खनेत उरला नव्हता.... पूर्ण ताकदीनिशी त्याने मराठ्यांविरुद्ध मोहीम सुरु केली स्वराज्य चहुबाजूने वेढले गेले होते छत्रपती संभाजी महाराज निकराची झुंज देत होते. पण औरंग्यारूपी काळाने आपला डाव साधला.... ४ फेब्रुवारी १६८९  रोजी शेख निजामाने संगमेश्वर इथे संभाजी महाराजांना अटक केली तो त्यांना त्वरेने घाटमाथ्यावर नेऊन पुढे औरंगजेबाच्या छावणीकडे दौडत होता इकडे मराठ्यांच्या गोटात हाहांकार उडाला होता.... त्या चकमकीत सेनापती म्हालोजी घोरपडे ठार झाले तर त्यांचे पुत्र संताजी घोरपडे व त्यांचे दोन बंधू तसेच खंडो बल्लाळ चिटणीस आदी मातब्बर असामी रायगडाच्या दिशेने निघाले एक दोन दिवसातच राजधानी रायगडावर छत्रपतींच्या अटकेची बातमी विजेच्या लोळाप्रमाणे येऊन कोसळली.... यावेळी रायगडावर मराठ्यांची महाराणी येसूबाईसाहेब आ...