फेसबुक व अन्य सोशल मीडियाचा पुरेपूर पण सुरक्षित वापर करा हे महत्वाचं. नाहीतर बसा malluapp वर शोधत
हल्ली रोज फेसबुकवर कोणाच्या ना कोणाच्या वॉल वर काही हास्यास्पद पोस्ट पाहायला मिळतायत. 'झुक्या भाऊ तुमच्याबद्दल काय म्हणतो' , 'मुली तुम्हाला बघून काय म्हणतात' , 'तुमचा मृत्यू कसा होईल' , 'किती मार खाल्ला आत्तापर्यंत तू भावड्या' , 'तुम्ही शिवाजी महाराजांच्या काळात असता तर' इथपर्यंतच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं फेसबुकवर शेअर केली जातायत. साला म्हटलं हे येत कुठून म्हणून थोडा शोध घ्यायच ठरवलं. त्या उत्तरावर क्लीक केलं तर त्या पेज वरून malluapps. net ला रीडायरेक्ट केलं गेलं. तिथे असलेच काहीसे प्रश्न आणि त्यांची उत्तर मिळवण्यासाठी तुम्हाला तुमच्या फेसबुक अकाउंटने लॉगिन करायचं होतं. आता मात्र डोक्यात किडा वळवळायला लागला आणि कुतूहलापायी malluapps. net ची कुंडली काढायची ठरवली. समोर आलेली माहिती खालीलप्रमाणे: + त्या पेजचे एकूण लाईक्स : ५,४७,००० + डोमेन एज : १ वर्ष ३९ दिवस + दररोज भेट देणारे(Daily Visitor) : १,७५,२९० + दररोज नवीन भेट देणारे(Daily Unique Visitor) : ३५०६ + जाहिरातीतून मिळकत(Advertisement Income) : प्रतिदिवशी (Daily...